पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी
घाण उग्र भपकारा
लांबूनच आला
क्वार्टर टाकून आला
सकाळी सकाळी
फेसाळत्या सोड्यात
बर्फाचा मनोरा
लिंबू जाउन बसले
जरासे बुडाशी
पाय जड झाले
दृष्टी नाही डोळी
अवस्था ही झाली
सकाळी सकाळी
किती पेग गेले
घशातून भरारा
म्हणे आठवांचा
सुटण्या येरझारा
घरचे निष्ठुर
म्हणती पितो देशी
विदेशी न मिळता
सकाळी सकाळी
रिकामी बाटली
अन पुडी फरसाणाची
जणू साक्ष देती
नादान पणाची