ती विडंबित कविता
धूसर होऊन
विरून जाते
कधी उचकापाचक
करता करता
अवचित दिसते
पुन्हा विडंबन ते
प्रतिक्रियांच्या
पल्याड नेते
अन् नकळत हसू
अवखळसे
ओठांवर येते
चिवट कवी हे
घाव विडंबित
सोशीत राहतो
अन् पुन्हा नवा
कच्चा माल पाहूनी
मी प्रच्छन्न हसतो
पैजारबुवा,