स्वतःची अक्कल इवलीशी
दुसऱ्याकडे ही असे थोडीशी
हे मान्यच नाही तयासी
काय म्हणावे या वृत्तीसी
पप्पूबाळा
मम्मा मॅडम मुग गिळीती
बडवून कापाळास घेती
पाहूनी तव मंदमती
जी तुझ्या खानदानाची महती
पप्पूबाळा
कैसी खांग्रेसची प्रगती
कैसा खांग्रेसचा नाश
केवळ असे दैवदूर्विलास
त्याचे दु:ख असे कोणास?
पप्पूबाळा
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
जनतेस करुनी त्रस्त
ज्ञान स्वतःचे पाजळतोस
का विदुषकासम वागतोस?
पप्पूबाळा
केवळ घराण्याच्या वंशी
जन्माला तू आलाशी
म्हणोनी अध्यक्षपदी बैसशी
मद्यपी मर्कटासम वागशी
पप्पूबाळा
गूढ,प्रगाढ असे राजनिती
त्यात नाही किंचितही गति
आपली अगाध अल्पमती
ठायी ठायी प्रदर्शिती
पप्पूबाळा
शेवटी एकची प्रार्थना रे
दया कर जनतेवर आता रे
आपली लायकी जाण रे
राजकारण सोडून जारे रे
पप्पूबाळा
पैजाराबुवा सावरकर