थोडे तांदूळ ,थोडे गहू
चला . . . कविता लिहू !
शब्द हाताशी, कल्पना मनाशी
जमते का ? .. पाहू !
सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले
अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू !
तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले
येते का बाहेर ! ? .. . पाहू !
काव्य गतीचा न्याय विचित्र
मनातले लपलेले चित्र
सहज निघते बाहेर का, पाहू !
सुरवात म्हणावे, की श्री गणेशा ?
सहज टाकला, आला नकाशा !
आता सांगा तुम्ही, मी पुढे जाऊ ?
----------------------
अतृप्त