एका कोपर्यात अंग फुगवून बसली होती सूरनळी
टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती ||
माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी ||
"
अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी
तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी
हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी ||
पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव
साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव
आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी ||
कधीही मी कामी येई सुटता कानी खाज
कोणत्याही कागदाचा तुकडा शोधा सोडून लाज
मोठ्या निगुतीने मग त्याची गुंडाळी वळी ||
उपयोग संपल्यावर तुम्ही मला कचर्यात टाकता
चोळामोळा करता आणि कुठेही भिरकावता
क्षणार्धात माझा उपयोग तुम्ही विसरुन जाता
मी मात्र तुडवली जाते कोणाच्याही पायदळी ||
कानात फिरवा बघा कशी झोप उडते
नाकात फिरवलेत तर फटाफट शिंक येते
नाक मोकळे होताच चेहर्याला येईल झळाळी ||
इतक्यात घाईने गुरुजी आले वर्गात
काय कचरा केला आहे? ओरडले मला जोरात
त्यांच्या ओरडण्याची मी केली मग सुरनळी
आणि विचारले घालू का ती योग्य स्थळी ||
पैजारबुवा,