प्राची ताईंनी केलेले या मोठ्या दुनियेचे वर्णन आपल्या मिपा वर्ल्ड ला पण चपखल बसते.
"गंमत केली" म्हणालास तू
मिपा वर पण सगळे पेटले
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे कोण अन् खोटे कुठले.
प्रतिक्रियले असंख्य त्यावर
धागा नवा तू जेव्हा काढला
मते वाचता एकेक खवचट
मनी असंख्य तरंग उठले.
नुसते +१, ठाक कोरडे
पोचते तरी बघ बोच त्यातली.
आभ्यास वाढवा, चपला घाला
डू आयडी ने पिंकून टाकले .
म्हणो कुणी ही मिपा दुनिया
नाही शाश्वत फक्त दिखावा.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे कोण अन् खोटे कुठले.
पैजारबुवा,