पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163
कितनी राते....
१.
तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात..
मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही!
पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला?
म्हणे "आरामात बसू"!
२.
म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही?
अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा.
(सत्य घटनेवर आधारीत..... शंका असेल त्यांनी आमंत्रण देऊन प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी )
मला वाटलं कसला दळीद्री आहेस तू ...
पण नंतर लक्षात आले की मागच्या पार्टीची वसूली करत होतास
कुत्र्या!
३.
तू दरवाजा उघडलास अन तुझे कुत्तरडे माझ्यावर भुंकायला लागले..
इतकं प्रेमाने म्हणालास त्याला ..
“टॉम्या काकां वर भुंकायचे नाही बरंका..”
बरं झालं तू त्यानंतर आत गेलास, पाणी आणायला..
कुत्तरड्याच्या पेकाटात एक लाथ घालता आली साणकन ..
अन मग म्हटले “आता सांग तुझ्या बापाला... काकांवर का भूंकतो ते..”
४.
स्कूटरवर बसल्यावर तुला नेहा आठवली..
अन् मला अमृता*..
साला अमृताचा नवरा नेमका त्याचा वेळी समोरून आला ...
त्याच्याशी बोलताना चेहरा निर्विकार ठेवायच्या नादात,
राहून गेले ना तुला सांगायचे की तुझी नेहुडी दुसऱ्यांदा आई होणार आहे ते
५.
इतकं लोचट कुणी असू नये
इतकं भिकारचोट पणे कुणी हसू नये
इतकं खोटं कुणी बोलू नये
फुकट मिळते म्हणून इतकी कोणी ढोसू नये..
नाही बुवा जमत आपल्याला मग आशांशी सभ्यपणाने वागणं..
६.
"आशा" वरुन आठवलं,
बरं झालं बारावीनंतर गणित सुटलं..
नाहीतर त्या गणिताच्या आशा मॅडमच्या तासाला त्यांच्या कडे उसासे टाकत बघत बसताना....
आपण नक्की गचकलो असतो ..
७.
तूम इतने कमीने हो फिर भी....
तुम्हारे साथ...
किसी शहर की किसी गली के...
किसी नुक्कड पे खडे..
किसी पानकी दुकान के पिछे
किसी कोने में, बातो बातोमे, गुजारी
कितेने इतवारोंकी कितनी राते....
मेरे मन के...
किसी कोने से....
गुजरने का नाम ही नहीं लेती....दोस्त
(* अमृताला समजू नये म्हणून नाव बदललेले आहे.)
पैजारबुवा,