कवी बा भा बोरकर यांचं कविता म्हणजे नैसर्गिक सौदर्य आणि स्त्री सौदर्य यांचे एक शालीन मिश्रण ... त्यात त्यांचे बालपण आणि निवृत्ती गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं मग तर काय मेजवानीच
त्यांचं कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद देणारा घेणारा एक कार्यक्रम (त्यांचे पुतणे डॉक्टर घनश्याम बोरकर ) बघण्यात आला त्याकाह हा धागा जरूर बघा
https://www.youtube.com/watch?v=zQyfwmGrpFs
https://www.youtube.com/watch?v=JQTxDh0pgdg
या व्हिडिओत १०.४९ वेळी मात्र मे मराठी ने माझी जाम गोची केली.. "बांगड्यांचे वर्णनं " या बद्दल हि कविता आहे , बोरकर + कोकण + तेथील खाणे असा विचार करून मी थोडा वेळ ( मूर्खसारखा ) हि कविता बोरकरांना दिसलेलय बांगडा मासोळी तील सौंदर्यबद्दल आहे असे समजत होतो ..
" श्रावणात त्यांच्या गावी कासार यायचा" असे स्पष्ट म्हणले असतां असे का झाले कोण जाणे ! गंमत आहे कधी कधी आपले मन कसे बरोबर चुकीचे वळण घेते !