kokan
- Read more about कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला
- Log in or register to post comments
- 4632 views
समींदरा रे समींदरा,
तू जपून आण माझ्या घरधन्याला
लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ||
नको उधाण आणू तुज्या पाण्याला
नको मस्ती करू देऊ वार्याला
काय नको होवू देऊ त्याचे होडीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२||
नारळ पौर्णिमेचा सण आता सरला
तुला सोन्याचा नारल वाढवला
नेल्या होड्या त्यानं मासेमारीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३||
मी कोलीण घरला एकली
सारं आवरून बाजारा निघाली
म्हावरं विकून येवूदे बरकतीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४||
- Read more about कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद
- Log in or register to post comments
- 1488 views
कवी बा भा बोरकर यांचं कविता म्हणजे नैसर्गिक सौदर्य आणि स्त्री सौदर्य यांचे एक शालीन मिश्रण ... त्यात त्यांचे बालपण आणि निवृत्ती गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं मग तर काय मेजवानीच
त्यांचं कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद देणारा घेणारा एक कार्यक्रम (त्यांचे पुतणे डॉक्टर घनश्याम बोरकर ) बघण्यात आला त्याकाह हा धागा जरूर बघा
https://www.youtube.com/watch?v=zQyfwmGrpFs
- Read more about वसंत उत्सव
- Log in or register to post comments
- 7018 views
तहान
सरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा
संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा
पक्षी दिशा दिशांना फीरतील ते थव्यांनी
सुकतील कंठ त्यांचे शोधतील ते पाणी
सुकली तळी जळांची पिण्यास नाही पाणी
लहान सानुल्या जीवांची होइल लाही लाही
त्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा
वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा....!
वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा.....!
धन्यवाद
- Read more about (तिखले)
- Log in or register to post comments
- 7628 views
बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले
कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले
मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले
वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले
बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले
शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले
तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले
रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले...
(गजब)
- Read more about (एक ग्लास त्याचा....)
- Log in or register to post comments
- 31842 views
बसण्याचा हिशोब साचा
एक ग्लास त्याचा, एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
ब्रँडही सारखाच
फक्त चखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा!
माझा आधी संपेल, त्याचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक ग्लास त्याचा, एक माझा!
- Read more about "बुवा....."
- Log in or register to post comments
- 15850 views
पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674
गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :)
गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुवा अता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा अधार मिळायला लागतोय