ज्या कृष्णांना राधा नसतात
आणि ज्या राधांना कृष्ण नसतात
त्यांनी काय करावे ?
ज्या कृष्णांना राधा असतात
आणि ज्या राधांना कृष्ण असतात
त्यांचे मनोमन कौतुक करावे
त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा
आदर करावा किमान राधेच्या
चारित्र्याचे उगाचच जज बनू नये.
ज्या कृष्णास राधा भेटत नाही
ज्या राधेस कृष्ण भेटत नाही
त्यांनी काय करावे?
न मिळालेल्या जोडीदाराच्या
निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे
किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या
जोडीदाराची इर्षा करु नये.
प्रेम पझेसिव्हनेस देत पण
पझेसिव्हनेस आणि आशाभंगण्यातून
येणारे दु:ख्ख दुसर्याच्या
निवडस्वातंत्र्याची जागा घेऊ शकत नाही.
त्यामुळे दु:ख्ख आणि राग बाजूस ठेऊन
खर्या प्रेमिका प्रमाणे प्रेयसाच्या अगदी
प्रत्येक निर्णयावर सकारात्म्क
प्रेम करावे, केवळ आणि विनाअट प्रेम करणारे
एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.