मी नाही कुणाचा बाप
मी नाही कुणाचा आजा
रंग बदलतो मी वारंवार
कुंपणावरचा सरडा जसा
मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून रहातो
नाही कुणाची पर्वा, आशा
नाही पुसले म्हणून निराशा
स्वानंदाचे टाळ घेऊन हाती
जगतो मी माझीच मिराशी