मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??
भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले.
मी काय चुकीचे केले??
एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही.
मी काय चुकीचे केले??
activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली.
मी काय चुकीचे केले??
संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला.
मी काय चुकीचे केले??
सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले.
“या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला.
मी काय चुकीचे केले??
“मी पुण्यात राहतो.”
“पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.”
“जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले.
मी काय चुकीचे केले??
“मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक”
“पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.”
ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली.
मी काय चुकीचे केले??
पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली.
“तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले.
ती काहीतरी पुटपुटत निघून गेली.
मी काय चुकीचे केले?? :(
सांगा सांगा मी काय चुकीचे केले??<:(