https://www.misalpav.com/node/51686पेर्णा
पैजारबुवां.... माफी,माफी,माफी.....
मुलगा शिकला विकास झाला
आला लग्नाला...
मुलगी शोधा विनवू लागला
बाजीराव नानाला...
काय अपेक्षा, कशी पाहीजे
विचारले नानाने....
चाटगपटला विचारून सांगतो
म्हंटले, (अर्ध्या) शहाण्याने....
आखूड शिंगी,बहुदूधी,
पण काळी सावळी........
नाना विचारता झाला
मॅच होत नाही रे भौ,ही तर जाफ्राबादी
चाटगपट म्हणाला.....
मुलगी शिकली प्रगती झाली
आली लग्नाला...
मुलगा शोधा विनवू लागली
बाजीराव नानाला...
काय अपेक्षा, कसा पाहीजे
विचारले नानाने....
चाटगपटला विचारून सांगते
कृ (मारी)....प्रज्ञाने.
जाडा भरडा,अमीर गरीब
कसाही असावा
फक्त एव्हढे बघा की तो,
आय टी वाला नसावा
पाच आकडी पगार त्याला
रोज घरीच असतो
प्रश्न पडला,का असे म्हणून
नाना विचारता झाला...
काय सांगू नाना तुम्हांला...
तर्हाच याची न्यारी
हनिमूनला काय करावे
ते ही............ चाटगपटला विचारते स्वारी
(तंत्रज्ञान मागासवर्गीय कॅटेगरीतला अनारक्षित. )