प्रेरणा - सर्वज्ञात
चालु होते माझे
रोजचेच काम
रोजचाच घाम
गॅसपाशी
एकीकडे होते
तांदुळ शिजत
दुधही तापत
दुजीकडे
लाटून कणिक
पोळ्या मऊसुत
गंध सुगंधित
खरपुस
इतक्यात येई
सख्याची ती साद
भलतीच याद
भलत्या वेळी
काय करावे ते
सुचेना काहीच
भर दुपारीच
चांदणे ते
मोहरले मीही
काम बंद केले
हात ही पुसले
पदराला
जवळ येऊनी
सख्या साजणाने
ओढले हाताने
अलगद
दुपारची वेळ
करुया साजरी
कशाला लाजरी
होत आहेस
इतक्यात काय
झाले ते कळेना
आशंकीत मना
भिती दाटे
चल हो तु पुढे
येते मी मागुनी
थोडे आवरुनी
पटकन
वेळ नको लाऊ
सखा आर्जवित
गेला बिछान्यात
आतुरतेने
मनीची भिती
खरी ठरली ती
आपदा भलती
भलत्या वेळी
शय्यागृही जात
साजणा बोलले
बेत बदलले
नको आता
काय झाले सोनु
विचारी साजण
आनंदी विरजण
काय बरे
काय सांगु आता
दुर्देव ते माझे
स्त्रीत्वाचेच ओझे
"प्रॉब्लेम" झाला