बंद पडलेली दारे
आत आठवणी गच्च
कुण्या देहाने त्या
जाऊन उलगडाव्या !?
रित्या रित्या खोल्या
रिती तावदाने
मनात आनमाने
संवाद करिती .
किती उन्हाळे
किती पावसाळे
आणि ग्गार हिवाळे
पाहीले या घराने ?
जुन्या आठवणींचा
जुना तो सहवास
हाच तो निवास
माझ्या अंतरीचा !
आता छतही गळते
गळतात काही आठवणी
मुक्या मुक्या मनाने
ओलवतात आठवणी !
ठेऊ मिटून त्यांना
पुन्हा बोलवतील कधी ?
नसतो समारोप ज्यांना
ओलवतील कधी कधी ?
--------------------------
अतृप्त ..
२/८/२०२३