स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा
नाही मी भोळा , कळेल मज .
जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे
अन्य कुणीकडे , कळेल निजरूप???
पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त
त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला !
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ
वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी
याशिवाय पाठी , नाही काही !
आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप
होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा .
मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे
. साफ करुनी त्याला , घडव पुन्हा .
आहे ऐसी क्रिया , धुवेल मूळ रूप
हाती देईल खूप , पुन्हा मातीचा गोळा .
पुन्हा घडव त्याला , तव जीवनी योग आला
आत्मारती तयाला , सहज विद्या सापडली .
ऐका रसीकजन , बोलते माझे मन
पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही .
तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग
तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची !
घेतो आता विराम , स्वल्प काळापुरता
काही हाती उरता , येइन पुन्हा सांगावया !
-----------------------
( जास्ती सिरियस होऊ नका . [ मी तर कधीच नसतो . =)) ] अधिक मासात स्वतःतले उणे शोधण्यासाठी काही डाएट प्लॅन करतोय . त्याचेच हे हलक्या शब्दातले जड काव्य आहे. )
अतृप्त ..
( १५/७/२३ )
#आत्मकाव्य
#आत्म्याच्या_कविता