आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले
प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच...
चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी,
दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.
न्हाऊन ये त्वरेने
न्हाऊन ये त्वरेने
तनू जर्द खाजणारी
काया अजून आहे
चिखलात माखलेली..
न्हाऊन ये त्वरेने
बत्तीच गुल्ल झाली,
काळीशार मळकुटी ती
खाकेत दाटलेली.
न्हाऊन ये त्वरेने
अंगांग घामलेले,
जळती अजूनी कैसे
नाकातले केसुले.
न्हाऊन ये त्वरेने
गंध आसपास,
बघ गुदमरून मेला
तो दूरचाही डास..
न्हाऊन ये त्वरेने
अंगी झणाणलेले
महिषी जाफराबादी
नखही तुझे न ओले ..
पैजारबुवा,