तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून,
गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत,
थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा.
त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं.
कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर..
आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ.
अगदी निवांत...
जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ..
....
मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत
आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू..
किती गोड चित्र असतं हे माहितीये?
....
चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना एखादा तीळ उगीच नाही काही भारी पडत ...
(गुलज़ारच्या एका देखण्या कल्पनेचा विस्तार करायचा प्रयत्न)