भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला
जाता जाता रवीने,कांचन ठेवा सांडला
काही डोळ्यांनी टिपला,काही नदीने लुटला
डोळ्याच्या कडांनी,मनाच्या तळी तो पोचला
नदीने मात्र, मुक्तहस्ते नभाला देऊनी टाकला
श्यामश्वेत मेघांनी,तो गिरी कंदरी वाटला
चाखला डोलणाऱ्या बकांनी,ठाव सोनेरी जाहला
पच्छीमेच्या मंद वाऱ्यांनी, त्यातला,थोडा किनारी आणला
मोठेपणा नदीचा पाहूनी जीव माझा भारावला.