आमची प्रेर्णा : अगा जे घडिलेचि नाही
एके रात्री - दुसरी सोबत, कवेत घेऊन तिसरीला
चत्वारि कुचमर्दित बसलो (खबर नव्हती पहिलीला)
पंचप्राणां धाप लागली, षड्रिपुंना तोषविले
सप्तमभोगें एकेहाती, अन्यभोगांसी लाजविले
अष्टभाव हे अनुभवतां, नवमद्वारीं योग साधला
गळुन गेले माझे मीपण दशदिशांत आनंद उरला !
-
शृंगाररात्री
_
अवघड शब्दांचे अर्थ :
१. चत्वारि - चार
२. सप्तम भोग : अष्टभोगांतील सप्तम अर्थात शय्या - मऊ बिछाना सुगंध वनिता वस्र गीत तांबूल भोजनम् !शय्या च कुसुमं चैव भोगाष्टकमुदाहतम् !
३. अष्टभाव : स्तम्भ, स्वेद, रोमांच, स्वरभंगा, वैश्वर्य, कम्प, वैवर्ण्य, आणि अश्रुपात
४. नवमद्वार : शरीराची नऊ द्वारे - दोन डोळे दोन कान नाक तोंड पायु उपस्थ