प्रेरर्णा
दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे,
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फुललेली ही फुले केसात तू माळून जा
शब्द तू,संगीत तू,
म्हणणारे दिपक भौ आज वेगळ्याच मुड मधे आहेत का? पण काही असो छान लिहीतात. त्यांच्या आभासी रचनेत वास्तवाची झलक दिसते. सांप्रत कवितेत मला आजच्या बेरोजगारीची हमी व अर्थिक नियोजनाशी झगडणारी तरूणाई दिसली. नियोजन फसले तर काय होते ते आपण सर्व बघतच आहोत. अशात एखाद्याला अचानक एक्झीट घ्यावी लागते तेव्हां मागे राहाणाऱ्या चे काय हाल होतात ते बघवत नाही.
शब्द जर काळजाला भिडले तर भावनांची सरिता दुथडी वाहू लागते.विडंबन असले तरी त्याला दुःखाची झालर दिसेल.
असो, त्यांची रचना आमची प्रेरणा. 😎
माफी आगोदरच मागीतली आहे.🤣
सर्व स्त्रि सदश्यां समोर पाढंरे निशाण......
(का या गळ्याच्या तळाशी...)
-
का या गळ्याच्या तळाशी बांधशी दोर तू
का सखी,सारखी डोक्यात जातीस तू.
-
अगणीत मागणे ते, "कधी संपायचे "
काय करू?कार्ड सारखे सारखे का मागशी तू?
-
नुरले खात्या (Bank) मधे काही, ऐकताना
का गं आता? थोबाड वेगांडशी तू.
-
एवढी कशी अशी खर्चाळू कैदाशीण,
खर्चले सारे, तरी माझ्याशी भांडशी तू.
-
साठवू मी किती तुला? म्हणतेस आणिक
मी जाता,चांदण्या मोजीत जगशील तू.