कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे ?
विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृतीच्या पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसे काही डॉक्टर बिनधास्त सांगतातही. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया, पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते. ते तुम्हाला समजले तर तुम्ही तो 'सेक्स' प्रकार बिनधास्त करावा.
सूंता केल्याने सेक्सला काय फायदा होतो ?
स्त्री-पुरुषांना सूंता करून सेक्समधे काही फायदा होत नाही. शीघ्रवीर्यपतनाला फायदा होतो असा समज आहे, परंतु असे दिसून येत नाही. अंतर्वस्त्र सतत शिश्नमुंडाला लागून तेथील त्वचेचा रंग बदलू शकतो इतकेच. पण कोणतीही लैंगिक समस्या येत नाही किंवा लैंगिक सुखात फायदा होतो असे नाही. काही धर्मात प्रथा म्हणून आणि शिश्नमुंडावरील त्वचा मागे जात नसेल तर सूंता करतात. काहीजण स्टाईल म्हणून सूंता करतात.
बाळंतपणानंतर स्त्रीला कोणत्या लैंगिक समस्या येतात ?
डिलिव्हरी नॉर्मल किंवा सिझेरियन (पोटातून), फोरसेप (चिमट्याने पकडून बाळाला बाहेर काढणे) कशी झाली त्यानुसार काही प्रमाणात कामजीवनात समस्या निर्माण होतात. त्यामध्ये पोटाला, योनीमार्गाला काही जखमा होतात, टाके बसणे यामुळे ठराविक आसनांमध्ये स्त्रीला वेदना होतात, त्यामुळे पहिल्यासारखे संभोगसुख घेता येत नाही. बाळंतपण जास्त वेळा योनीमार्गातून झाले असेल तर योनीमार्ग 'ढिला' पडतो, त्यामुळे योनीशिश्नमैथुनात घट्टपणा जाणवत नाही. बाळाकडे जास्त लक्ष द्यावे लागते. स्तनातून दूध आल्याने व संप्रेरकांच्या बदलांमुळे स्त्रीमध्ये वासना कमी होते. ही समस्या कायमस्वरूपी नसते. बाळाने दूध पिण्याचे बंद केल्यावर म्हणजे साधारण १ वर्षानंतर लैंगिक जीवन सुरळीत होऊ शकते. या सर्वांचा विचार न करता बरेच पुरुष तसाच संभोग करतात. स्त्री मूग गिळून गप्प बसते.
लैंगिक समस्येमुळे घटस्फोट झालेल्या व्यक्तीने पुन्हा दुसरे लग्न करावे का?
याआधी कोणत्या लैंगिक समस्या होत्या, त्यावर उपचार केलाय का, यावर दुसरे लग्न करावे की नाही हे ठरते. लैंगिक संबंधाला महत्त्व न देता फक्त एकत्र आयुष्य जगणे असे दोघांचे मत असेल तर अडचण येणार नाही. पण एकाची लैंगिक जीवन जगण्याची इच्छा आहे आणि पुढील व्यक्तीची इच्छा नाही, सेक्सला तयारच नाही, पुरुषांच्यात नपुंसकता, समलिंगी असणे, वृषणग्रंथीच नाही, जन्मजात लैंगिक आजार अशा केसेसमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा, सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. इथे कुणीही कुणालाही फसवू शकतो हे लक्षात असावे.
पुरुषांसाठी कोणता कंडोम चांगला ?
पुरुषांनी प्रत्येक सेक्सवेळी नीट आणि चांगल्या प्रतीचा कंडोम वापरला तर गर्भधारणा, काही गुप्तरोग, HIV यापासून संरक्षण देतो. त्यात स्त्रीला आणि पुरुषाला सेक्समधे विविधता आणण्यासाठी, आनंदासाठी वेगळे वेगळे कंडोम्स आता उपलब्ध आहेत.
extra time, extra thin, extra dotted, ribbed, scented, flavoured, extra large, extra lubricated, spiral,coloured, extra fit, अंधारात चमकणारा असे विविध कंडोम्स स्त्री-पुरुष दोघांना सेक्स करताना वेगळेपणा अनुभवन्यासाठी वापरतात. गर्भधारणा, HIV आणि काही गुप्तरोग यापासून संरक्षण हे यामुळे होतेच. ज्याला जो आवडेल त्यानुसार तो वापरावा. फक्त तो वापरण्याआधी त्याची expiry date तपासून घ्यावी.
'सिझेरियन' झाल्यानंतर संभोगसुखामध्ये काही वेदना होतात का ?
सिझेरियन हे शस्त्रक्रियेचे नाव आहे. त्यामध्ये गरोदर स्त्रीचे पोट व गर्भाशयाला एक काप देऊन मूल पोटातून बाहेर काढले जाते. स्त्रीचे नाभी व योनी याच्यामधील भागातून हे कापले जाते. शस्त्रक्रियेनंतर टाक्यांचा त्रास काही स्त्रियांना होऊ शकतो. 'स्त्री'वर आरूढ होऊन संभोग करताना टाक्याला धक्का बसून वेदना होऊ शकते. तसेच मागून योनीमार्गातून संभोग करताना पुढे पोटावर/टाक्यावर धक्के बसल्याने वेदना होतात. त्याचबरोबर ती स्त्री जाड आहे की कृश आहे ते टाके कसे वापरले आहेत त्यावर काहीसे अवलंबून आहे. संभोगात विविधता करताना काही आसनांमध्ये या टाक्यांचा त्रास होतो इतर आसनांमध्ये नव्हे. त्यामुळे योनीमार्गातून शिश्नप्रवेश करताना कोणतीच तक्रार येत नाही.
सिझेरियनच्या शस्त्रक्रियेच्या खुणांवर पुरुषांच्या शरीराचा किती दाब पडतो, कसा पडतो, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किती यावर थोड्याफार तक्रारी येतात. यात गंभीर असे काही नाही. बाळ मातेचे दूध पीत असल्याने या काळात योनीमार्गात ओलावा निर्माण न झाल्याने संभोगात वेदना होऊ शकतात. तरी अडचण वाटलीच तर सेक्सोलोजिस्ट , स्त्री रोग तज्ञ डॉक्टांचां सल्ला घ्यावा.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)