स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का?
भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही.
फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही. गुदमैथुन करताना स्वच्छता पाळावी, औषधी वंगण, कंडोम यांचा योग्य वापर करावा लागतो. अनोळखी व्यक्ती बरोबर असुरक्षित anal सेक्स केला तर गुप्तरोग पसरण्याची शक्यता असतेच. सुरक्षित सेक्सचे नियम इथे पाळले पाहिजेतच. यामधे दोघांनाही सुख मिळू शकते. कामसुत्रमध्येही याचा उल्लेख आहे. तसेच आधुनिक कामसूत्रमध्येही याचा उल्लेख आहे परंतु त्यामध्ये गुदमैथुनाला विकृत मानले गेले नाही.
शारीरिक संबंधावेळी पूर्ण नग्न व्हावेच लागते का ?
पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर संभोगात आला की अतिउच्च आनंद मिळतो. पूर्ण नग्न एकमेकांच्या मिठीत आल्यानंतर त्वचा संपर्क वाढतो व त्वचेला चांगल्या संवेदना मिळतात. कपडे घालून किंवा ठराविक कपडे घालून संभोगसुख घेताना कपड्यांनी अच्छादित केलेली त्वचा ही स्पर्शापासून लांबच राहते. संभोगावेळी थोडा ते जास्त उजेड असणे महत्त्वाचे असते. जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा ? याचा तुम्हीच विचार करा.
नवविवाहित जोडप्यांना कामजीवनाची माहिती मिळविण्यासाठी कामुक चित्रपट, पुस्तक भेट देणे योग्य आहे का ?
बिलकुल नाही ! यातून स्त्रीच्या स्तनाविषयी, योनीतील स्त्राव, कामवासना, पुरुषाचा लिंगाकार, जास्त वेळ चालणारा संभोग, रात्रीतून बऱ्याच वेळा करणारा याविषयी अतिशयोक्ती वर्णन केलेले असते. यातून संभोगाचे आसन, काय सत्य/असत्य हे जोडप्यांना समजत नाही. हे वाचून निराशा झाली की प्रचंड मानसिक दबाव दोघांवरही येतो व पहिल्याच दिवशी गैरसमज होऊ शकतात, खटके उडतात. हळव्या मनाच्या लोकांकडून आत्महत्या घडलेली आहे, हे कटू सत्य आहे.
कामवासना वाढवून शमविण्यासाठी चित्रपट, पुस्तकांचा वापर योग्य आहे, पण कामजीवनाविषयी शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला विवाहापूर्वीच घेणे महत्वाचे असते, कामुक चित्रपटमधील सत्य असत्य पुर्ण माहिती असल्याशिवाय चित्रपट पाहू नये.त्यामुळे असे चित्रपट, पुस्तक नवजोडप्यांना भेट देऊ नये.
सेक्स टॉय वापरून कामपूर्ती जरी होत असेल, तरी शरीरसुख घेणे चांगलेच आहे ना ?
विवाहित ,अविवाहित , विधवा, घटस्फोटित कुणीही सेक्स करू शकतात सेक्स toy वापरू शकतात.पार्टनर असताना वापरणे न वापरणे हे दोघांनी ठरवावे.काही नाविन्य म्हणुन वापरतात.काम पूर्ती जलद मिळावी म्हणुन करतात.कामपूर्ती कशी मिळवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सेक्समधून होणारा आजार, गर्भधारणा आणि पार्टनरची उपलब्धता यावर ठरते कसे वासना शमविता येईल. काही दोन्ही पद्धत वापरतात.शरीरसुख आणि सेक्स toy. हे चांगलेच आहे. स्थळ, काळ, देश, तेथील नियम, सेक्स विषयक विचार यावरून तिथले लोक विचार करतात. पण सेक्स ही नैसर्गिक बाब आहे. त्यावर नीतिनियमाचे बंधन घालून ते कंट्रोल करता येत नाही. उलट अशा समाजातील लोकं सेक्सबद्दल खूप खोटे वागतात आणि बोलतात असे दिसून आले आहे. काहीही असले तरी असा सेक्स करायचा की नाही ही सर्व जबाबदारी त्याची त्यांनीच घ्यायची आहे.
लिंग सरळ करायला उपचार काय ?
मुळातच लिंग उद्दीपित झाल्यावर कोणत्याही बाजूला कलू शकते. वाकडे असणे वेगळे आणि तिरके असणे वेगळे. नॉर्मल माणसात तिरके असले तरी त्याला वाकडे म्हणून पुरुष घाबरतो आणि त्याचा गैरफायदा भोंदू डॉक्टर घेतात. इथून फसवेगिरी सुरू होते. तिरक्याचे सरळ करण्याची गरज नसते. खरेच वाकडे असेल तर त्याला शस्त्रक्रिया आहेत.हस्तमैथुन, झोपेतले विर्यपतन यामुळे लिंग वाकडे वा तिरके होत नाही, हे लक्षात घ्या.
नपुंसकतेवर 10/20 mg तसेच 50/100mg गोळया असतात. यातली 50/100mg ही जास्त पॉवरफुल असते का ?
वेगवेगळ्या गोळ्यांच्या वेगवेगळ्या मात्रा असतात. जी गोळी 50/100 mg मात्रेत देणे बरोबर असते ती गोळी 10/20 mg देऊन चालत नाही आणि 10/20 mg ची गोळी 50/100 mg मात्रेत देणे धोकादायक असते. गोळ्यांची mg किती द्यावी हे पेशेंटनी ठरवू नये. तसेच mg किती आहे यावरून अंदाज करू नये. दोन्ही गोळ्या या त्या त्या मात्रेत चांगलेच काम करतात.प्रत्येक केस मध्ये गोळी किती मात्रेत दयावी हे तज्ञ डॉक्टर ठरवत असतो.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)