सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी
'सरोगेट पार्टनर' म्हणजे असे पुरुष अथवा स्त्री की जे कामजीवनाविषयी प्रशिक्षण घेतलेले असतात व कामशास्त्रज्ञाकडे आलेल्या स्त्री-पुरुषांना कामजीवनाविषयी काहीवेळा प्रत्यक्ष कृती करून शिकवत असतात. स्त्री-पुरुष दोन्ही 'सरोगेट पार्टनर्स' असतात. स्त्री पेशंटसाठी पुरुष व पुरुष पेशंटसाठी स्त्री सरोगेट पार्टनर तयार असतो.LGBT साठी देखील असे सरोगेट ट्रेन केले असतात. प्रत्येकवेळी सेक्स केला जातोच असे नाही. नपुंसकत्व, शीघ्रवीर्यपतन यावर उपचार करताना स्त्री सरोगेट पार्टनर त्या पुरुषाशी *काहीवेळा* लैंगिक संबंध ठेवतात, कामजीवनावरील काही पद्धती पुरुषाला शिकवतात. अर्थात ही पद्धत आज बहुतेक ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. परंतु काही प्रगत देशात अशा संस्था अजून कार्यरत असल्याचे समजते. या सरोगेट पार्टनर्सचा शोध लागल्यावर हा 'वेगळ्या प्रकारचा वेश्या व्यवसाय आहे' अशी टीका देखील झाली. त्या डॉक्टर्सना या गोष्टी बंद करण्यासाठी दडपण आणले गेले. काही कामशास्त्रज्ञांच्या मते अवघड लैंगिक समस्यांमध्ये सरोगेट पार्टनर्सचा चांगला उपयोग होतो असे आढळून आले आहे.सरोगेट पार्टनर्सकडून स्त्री-पुरुष पेशंटवर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता असते असे काहींचे म्हणणे आहे.
'सरोगेट पार्टनर्स' सारखेच 'बॉडी वर्क थेरपी' यामध्ये खुद्द कामशास्त्रज्ञ आलेल्या स्त्री-पुरुष पेशंटशी शारीरिक संभोग करून कामजीवनावरील पद्धती शिकवतो. ही पद्धत आज सर्वत्र बंद आहे. या दोन्ही उपचारपद्धतीचा वापर करून त्यावर काही इंग्रजी चित्रपट व कादंबऱ्याही निघाल्या आहेत.
स्त्री सेक्सला नाही म्हणत असेल तरी पुरूष का दबाब करत असतो?
दोघांची लैंगिक भूक ही वेगळी असते. स्त्रीच्या नकारामधेही होकार असतो, असा पुरुषाला गैरसमज असतो. त्यामुळे तो सेक्स करताना स्त्रीच्या इच्छेचा विचार करत नाही. कामजीवनातील आवड-निवडीविषयी खुली चर्चा दोघांमधे होत नाही, म्हणून ही अडचण येते. स्त्री विरोध करत नाही, गप्प तयार होते असे लक्षात आले, की तिचा नकार हा होकारच आहे, असे गृहीत धरले जाते. अशा सेक्समधे स्त्रीला योनिमार्गात ओलावा येत नाही, कामपूर्ती मिळत नाही, वेदना होतात, असे प्रकार भरपूर जोडप्यांमधे पहायला मिळतात. दोघांनी खुलेपणाने एकमेकांना आवड निवड सांगणे आणि तसे वागणे हा योग्य पर्याय आहे. योग्य Sexologist ची मदत घ्या. नीट समजुन घ्या.
हस्तमैथुन आणि सेक्स यापैकी कशाने जास्त सुख मिळते आणि वीर्यनाश कशाने जास्त होतो ?
वीर्यनाश तर कोणत्याच क्रियेने होत नाही. वीर्यनाश होतो हा निव्वळ गैरसमज आहे. त्याने कोणती ताकद कमी होत नसते. वयात आल्यावर वाढलेली वासना शमवण्यासाठी सेक्स आणि हस्तमैथुन हे दोन पर्याय आहेत. वीर्य पडल्यावर वासना शमल्याने आनंद मिळतो. सेक्स केल्याने पण आनंद मिळतो. हस्तमैथुनच्या तुलनेत सेक्स केल्याने जास्त सुख मिळते. कारण दुसरे शरीर, स्पर्शसुख जास्त असते. ज्यांना जास्त सेक्ससुख उपलब्ध असते त्यांच्यात हस्तमैथुन प्रमाण कमी होते. सुरक्षित सेक्स करता येत नसेल तर हस्तमैथुन योग्य. निदान कोणता गुप्तरोग होण्याची भिती नसते.
लैंगिक समस्येवरील औषधांचा खप वाढला आहे याचा अर्थ पुरुषांच्या समस्या वाढल्या असा होतो का?
औषध खप वाढला म्हणजे त्याची गरज त्या पुरुषांना असतेच असे नाही. बऱ्याचदा फार कमी गोळ्या उपचारासाठी पुरेशा असतात, पण काही डिग्री असलेले डॉक्टर पैसे मिळवण्यासाठी भरपूर औषधे पेशंटच्या गळ्यात मारतात. काही लैंगिक समस्यांमधे गोळ्या जास्त दिवस आणि काही कालावधीसाठी घ्याव्या लागतात. सेक्स समस्यांना धरून भीती, लज्जा आणि अज्ञान असल्याने लोक उल्लू बनतात. नॉर्मल असताना बॉयफ्रेंड स्वतःच्या लैंगिक क्षमतेविषयी भीती बाळगतो आणि गोळी घेत राहतो. त्यामुळे हा खप वाढताना दिसतोय. समस्या व्यसनाधीनता, लठ्ठपणा, मधुमेह यामुळे वाढले हे खरे आहे, पण त्याचबरोबर वरील गोष्टींमुळे खप वाढलेला दिसतो, हे पडद्याआडचे सत्य आहे.
लिंग मजबूत करण्यासाठी काही उपाय आहे ?
निसर्गतः स्त्री-पुरुषाला जे अवयव आहेत ते नॉर्मल माणसात व्यवस्थित असतात. लिंग हे सेक्स आणि मूत्रविसर्जन करण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी जे लिंग आहे ते पुरेसे ताकदीचं आहे. सेक्स करायचा म्हणजे काहीतरी मोठे काम आहे, त्याला खूपच ताकद लागते अशा गैरसमजापोटी लोक चुकीच्या अपेक्षा करतात. त्यातून त्याची ताकद, मजबूती वाढवण्यासाठी विचार मनात घट्ट घर करून बसतात. माझ्या माहितीप्रमाणे पुरूष लिंगाने बादली,बॅग्स उचलायचे गरज नाही.आणि पळत जाण्याला देखील त्याचा उपयोग नाही.त्यामुळे लिंग ताठरता येते एवढे पुरेसे असते .ताठरता येत नसेल तर त्यावर उपचार असतो पण मजबूत करण्याचा काही संबंध नाही. लिंग विषयी शास्त्रीय माहिती नसेल तर किती गैरसमज होतात हे या अपेक्षेवरून समजते.
पेपरमधील वा इंटरनेटवरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
दररोज सेक्स करणे चांगले की वाईट ?
दोघांचीही इच्छा असेल तर उत्तम. सेक्सने त्वचा, हृदय, संप्रेरके, मेंदू, मन, शुक्राणू यांना फायदा असतो. पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे. अर्थातच २१ वेळा वीर्यपतन हस्तमैथुन किंवा सेक्स यातून होऊ शकते. फक्त सेक्समधूनच व्हावे असे नाही. इथे महत्वाचे आहे ते पार्टनरची इच्छा असणे. कारण अशा माहितीमधून पुरुष अर्धी माहिती मान्य करतो. पार्टनरचा विचार करत नाही. हल्लीची मुलं-मुली सेक्स लवकर अनुभवतात. पण सेक्स माहिती अर्धवट आहे. फक्त कोण्डोम वापरायचा असतो एवढेच माहिती आहे. त्यामुळे विवाहापूर्वी बॉयफ्रेंड बरोबर सेक्स करताना चुकीची अपेक्षा करून वाद जास्त होऊ लागलेत. तसेच विवाहित तरुणी त्यांच्या पार्टनरकडून अतिअपेक्षा करून त्या पूर्ण झाल्या नाहीत, की घटस्फोटचा निर्णय जलद घेतात. यात लैंगिक जीवनाबद्दल अर्ध्या माहितीवर हा सगळा घोळ होत आहे. म्हणजे विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा पण त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)