◼वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन-
६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते.
◼फॅलोपिअन ट्यूब-
फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली. नंतर त्याच्या नावावरून फॅलोपिअन ट्यूब असे नाव पडले.
◼पोर्नोग्राफी-
वाचक, दर्शक, श्रोता याला कामुक कथा-कादंबऱ्यांतून, कामुक भाषणातून, कामुक चलचित्रपटांतून कामोद्दीपन करणे हा याचा उद्देश असतो. प्रत्यक्षात पोर्नोग्राफीचा अर्थ म्हणजे वेश्येशी शारीरिक संभोगाचे लिखाणातून वर्णन करणे.
◼कामसूत्र प्रथम इंग्रजीमध्ये रूपांतरीत-
सर रिचर्ड बर्टन यांनी १८८० साली भारतीय कामसूत्राचे इंग्रजीत रूपांतर केले आहे. भारताबाहेर याची यशस्वी विक्री झाली. मूळ भारतीय कामसूत्र १००-४०० A.D. या काळात लिहिले गेले.
◼'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग-
हे नाव कसे पडले याविषयी मतभेद आहेत. चार्ल्स (दुसऱ्या) याच्या काळात डॉ. कंडोम/कंटोन या फिजिशियनवरून हे नाव पडले. १७०६ मध्ये एका कवितेमध्ये 'कंडोम' या शब्दाचा वापर केला गेला. या काळात वाढलेल्या गुप्तरोगाला आळा घालण्यासाठी याचा खूप वापर केला जात होता.
◼नपुंसकत्वाची पहिली व्याख्या-
१८३३ व १८५८ च्या आवृत्तीमध्ये 'कोपलँडस् डिक्शनरी ऑफ प्रॅक्टिकल मेडिसिन' या शब्दकोशात नपुंसकत्वाची व्याख्या प्रथम प्रकाशित झाली. १९५० साली स्ट्रॉस यांनी 'संभोग' करण्यामधील कमकरता अशी व्याख्या केली. अन्सर्ट जोन्स (१९१८) विरुद्धलिंगी संभोगामध्ये पूर्ण अथवा थोडी ताठरता न येणे व अपेक्षित सुख न मिळणे याला नपुंसकत्व म्हणावे अशी व्याख्या केली.
◼शिश्नाचे जलद उद्दीपन-
प्रत्येक पुरुषांमध्ये शिश्नाचे उद्दीपन होण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागू शकतो. तसेच एका पुरुषामध्ये वय, कालानुसार कामवासनेची पातळी यावर शिश्नाचे उद्दीपन ठरते. किन्से इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात अगदीच लवकर म्हणजे फक्त तीन सेकंदात पुरुषाचे लिंग चांगले उद्दीपित होऊ शकते, असे दिसून आले.
◼पुरुषांमध्ये जलद कामपूर्ती-
सरासरी १४-१६ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हस्तमैथुनावेळी १० सेकंदांत कामपूर्ती होते. ६.४ टक्के मुले दहा सेकंदापेक्षा कमी वेळेत कामपूर्ती अनुभवतात. इतर मुलांत १ मिनिट लागतो. किन्सेच्या सर्वेक्षणातून असे दिसते की प्रौढांपेक्षा पौगंडावस्थेतील मुलांमध्ये ताठरता लवकर येते.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)