श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं.
कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले...
X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.
नारायण धारप यांनी युगपुरुष ही खिळवून टाकणारी विज्ञान कथा १९७० मध्ये प्रकाशित केली.
युगपुरुष आणि X-men या चित्रपटाच्या थीममधे आपल्याला भरपूर साम्य सापडेल.
पण अमेरीकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतातली एक गोष्ट सूर्यप्रकाशातही येत नाही...
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
त्यांनी या कथा ज्या काळात लिहिल्या, तेव्हा आजच्यासारखे घराघरात टेलिफोन, TV, कॉम्प्युटर, इंटरनेट हे काहीही अस्तित्वात नव्हते आणि लोकांना विज्ञान कथेची चव नव्हती. पण त्यांच्या कल्पनाशक्तीने आणि भाषा प्रभुत्वामुळे मी नेहमीच भारावून जातो. त्यांची कथा वाचकाला अक्षरशः गळा दाबून धरते. जर ते परदेशात असते, तर बेस्ट सेलर्सच्या यादीत त्यांच्या कथा सर्वोच्च स्थानी अखन्ड विराजमान झाल्या असत्या. परंतु त्यांची कल्पना शक्ती जरी आकाशगंगेमध्ये संचार करत राहिली तरी त्यांनी जमिनी वरचे पाय कधी सोडले नाहीत.
सर्वसामान्यपणे त्यांना भयकथा लेखक म्हणून जरी ओळखलं जात असलं तरी त्यांच्या विज्ञानकथा काळाच्या फार फार पुढच्या होत्या. त्यांना भेटल्यानंतर त्यांची प्रेरणास्थानं असलेले पाश्चात्य लेखक मुळातून वाचले. (त्यांनीच सुचवल्याप्रमाणे)
युगपुरुष ही कथा Time is the simplest thing (Clifford Simak) या कथेवर आधारीत असल्याचा त्यांनी उल्लेख केलाय पण मूळातून ती कथा वाचल्यानंतर पुन्हा नारायण धारप यांना सलाम करावासा वाटतो कारण मूळ कथेतला फक्त ५-१०% भाग त्यांनी वापरला पण बाकी सर्व त्यांचा स्वतःचा कल्पनाविस्तार आणि प्रतिभा आहे. मुख्य म्हणजे आधारीत कथांमधे जी अडखळती awkward भाषाशैली येते त्याचा कुठेही मागमूस नाही, अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेली ही कथा १००% मराठी मुशीत घडलेली एक अप्रतिम कलाकृती आहे....
त्याची कोणतीही विज्ञानकथा ही बेस्टसेलरच होती पण दुर्दैवानं त्यांना मराठीत तसा प्रतिसाद मिळाला नाही.
मागे किल्लेदारांनी विचारणा केली होती की त्यांच्या कथा कुठे वाचायला मिळतील. (फुकटात) तर बऱ्याच यू ट्यूब चॅनल्सचा धांडोळा घेऊन spoler alert (काही ठिकाणचं मराठी कानातून रक्त आणतं) - शेवटी
SansoVoice या youtube चॅनलवर काही कथा ऐकल्या audiobook स्वरुपात - केवळ उत्कृष्ट...
सायन्स फिक्शनची आवड असेल तर आपलेही आवडते लेखक आणि अनुभव ऐकायला आवडेल...
धन्यवाद - अनुनाद...