https://www.misalpav.com/node/50568/backlinks
आमची बी एक आठवण...
कविवर्यांची क्षमा मागीतली आहे.
खिशातल्या रूमालाला
घामाचा वास
मनाला लागला
तूझाच की ग ध्यास
चार कप्प्यातला
एक कप्पा होता खाली
तू येणार म्हणून
साफसफाई केली
घरावरून मारल्या
दिवसाच्या चकरा सात
बात नाय बनली कारण
जय विजय उभे दारात
बांधीन म्हणलं
सात तळाची माडी
पण सावळ्या कुभांराची
गाढवं मधी आली
ऊगाच घेतला ध्यास
डोक्याला कल्हई झाली
चांदोबा नाय दिसला
पण फुकट धुलाई झाली
काय सांगू आता
आठवणीत जगतो
मनातले मांडे खाऊन
रूमालाला घाम पुसतो
कसरत
१४-८-२२