पेरणा आमचे परम मित्र श्री श्री १०८ अनन्त्_यात्री यांची ही कविता http://misalpav.com/node/50404
(सन्तूर)
झटपट छनछन तुषार अगणित
भवतालाला व्यापत उडले
रोमरोम पुलकित करुनी त्यांनी
वरुणावरती गारूड केले
स्वरचित्रातील अवकाशात
अचूक तिचे आगमन झाले
सुंदरीचे त्या चिमुरडीशी
निगूढ नाते पुनश्च कळले
स्वप्नशिल्पातील कल्पनेचा
वर्तमानाशी घालूनी मेळ
नेहमी सारखा सहज रंगला
सुपरमॉमचा अद्भुत खेळ
पैजारबुवा,
कवितेतले गूढ उलगडण्यासाठी खालील व्हिडीओ जरूर पहावा