आत्मसमरूप दिसतात ओळी
आत्मस्वरूप असतात ओळी .
इथे नदीचा दिसतो काठ
तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी .
निराळ्या वेदनेच्या एकाच गावी
दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी
कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे
दिसे मी उगाचच तिथला निवासी
असे शब्द साधे येतात साथी
कविता त्यातुन वाहते प्रपाती .
उरी अंतरी घाव नाजूक खोल
वरी दिसते केवळ शांत ज्योती !
आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती
जशी वेदना ती , तसे शब्द हाती.
मनाचेच सारे इथे मांडयाचे ..
न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे?
असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . .
माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे .
.भोगूनी जाईन अतृप्ती सारी ...
तिथे शब्द तृप्त होतील सारे ..!
================
अतृप्त