पेर्णा पाभे सरांची तू
http://misalpav.com/node/50075
थू -१
तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग
अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग
तू हसते अशी छाती माझी धडधडे ग
गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग
तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग
येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग
बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग
तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग
बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग
-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-
थू -२
तू चालतो असा जणू नागोबाची चाल रं
अंगावरती कळकट कपडे डोक्यावरती टक्कल रं
तू हसतो तेव्हा एका नंबरी मुर्खा सारखा दिसतो रं
काळ्या पिवळ्या दाता मध्ये निळी जांभळी जीभ रं
तुझ्या येण्याबरोबर एक दुर्गंधी भपकाराही येतो रं
त्यात सारखा तू जाता येता पाद्प्रोक्षण करतो रं
तू दिसतो तेव्हाच अंगावरती लाट भीतीची येते रं
तुझी उधारी तुला सांगता मीच लाजूनी जातो रं
तू कोडगेश्वर दारुडा अन निर्लज्जशिरोमणी रं
तुझ्या ठाई सारे दुर्गुण ठासून ठासून भरले रं
-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-
थू -३
तू धावते अशी जणू की नरभक्षक ती वाघीण ग
पाहुनी तुझे ते रौद्र रुपडे अंगावर काटा येई ग
तू भुंकते अशी पाठीवरती घामाच्या धारा वाहती ग
गुरागुराटाने तुझ्या कित्येकांची वसने पिवळी होती ग
तुझ्या येण्यानं मुले आपूला खेळ सोडूनी पळती ग
पाळता पाळता तुझ्या नावाने बोंबा जोरात मारती ग
तू बघते तेव्हा अंगावरती भीतीने शहारा येतो ग
बघून तुला लांबूनच मी थिजल्यासारखा होतो ग
तू सतत भूंकरी चावणारी पिसाळलेली कुत्री ग
तुझ्या पेकाटी संधी मिळता लाथ एकदा घालेन गं
-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-
पैजारबुवा,
६१-६२-६३६४