वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ?
झाडाला फुले लागल्यावर
की
कोकीळेने कुहू कुहू केल्यावर
की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?