http://www.misalpav.com/node/50007/backlinks
श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू.....
रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी
नका शोधू यात जोडगोळी कुणाची
पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची
नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची
शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची
का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची
लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन)
दिला हात गरिबांना त्यांच्या अडी नडीला
फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला
बाधंली ही माडी जोडून पै... पै ला
का भिववीतो मज दाखवून त्या ईडीला
व्रतस्थ मी विरागी जनसेवा स्वांग साझे (एक मेका साह्य करू)
मोडू नकोस दुष्टा लागलेले बकध्यान माझे
ठेव तो हातोडा तुला आण या घडीची
करू दे मला तू सेवा या "दौलतीची"
-कवी कसरत
निर्मल आनंद घ्या,हल्के घ्या.