पहिली,दुसरीला बसवलं
होतं फाट्यावर
तीसरीने केली कुरघोडी
आणून बसवलं खाटेवर
कधी आली,कशी आली
माहीत नाही कुठं गाठ पडली
अतीरेक्या सारखी घुसली
पहिल्या फळीची दाणादाण उडली
लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर
लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव
तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली
शिजत नाही डाळ बघून
मागे परत फिरली
टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे
ती बिचारी हारली
ती बिचारी हारली.......
सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे. "सिर्फ त्रिवेदी बचेगा "। याचाअर्थ आज कळतोय. ज्याने आहार विहार आणी निद्रा हे तीन वेद समजुन घेतले तो नक्कीच वाचणार हे या तीन लाटा मधे स्पष्ट झाले आहे. टिबं टिबं मधे बरेच जण आहेत त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.