बाल्कनीतली फुले
रंग सारे फूलले।
धुंद झाली बाल्कनी।
रंग सोहळा फुलांचा
नेत्र सुखावू लागली
सखी शेजारची माझ्या
वेळावून भ्रूभंग टाकते
बहरलेले झाड माझे
का ग डोळा खुपते
दृष्ट लावू नका कोणी
झाड वयात आलेले
ओढुनी मद यौवनाचा
नवचैतन्य येथे बहरले
बहरली रातराणी
पारिजात ही बहरला
शुभ्र पांढर्या मोगऱ्याचा
गंध आसमंती पसरला
उधळले रंग सारे
जणू रागदारी मांडली
पंचमीची मुठ माझ्या
दारी की हो सांडली
शिंपले काटे जरी मी
तरी फुल ही उमलले
सुर कळी पाकळीतून त्यांच्या
जीवनाचे उमटले