सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...
पेरणा, प्राची ताईची ही कविता
http://www.misalpav.com/node/49553
प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)
स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून.
माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरुन सांगतो हे गाणे असे भारी आहे की दुसऱ्या कोणाlला खरा अर्थ लक्षात येण्याची शक्यताच नाही.
मग म्हटले आपणच खरा भानुवाद करून सर्व होतकरू कविं समोर एक आदर्श निर्माण करावा,
मेरा कुछ सामान... भावा...(बघ)..अनुवाद.
माझ्या काही वस्तू,
चोरट्या तू, ढापुन नेलेल्या
श्रावणात ओल्या ओल्या,
चड्ड्या त्या, दांडी वरल्या,
आणि पुडक्या, राखुंडीच्या,
पत्रात बांधलेल्या
राखुंडी परत दे,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...
उन्हाळ्याच्या दिवसात कोकमे,
हा हा हा ...काय बरोबर ना?
उन्हाळ्याच्या दिवसात कोकमे,
अन आंबे पाडायचा कोयता,
लगेच देतो सांगून, नेला होता
जीभ कशी झडत, नाही मेल्या,
खोटं बोलता
गुमान कोयता आणून दे,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...
माझ्या गळक्या छत्री मधे,
अर्धे अर्धे भिजत असताना
पिशवीतले सुकट बोंबील,
पाहिले मी तुला चोरताना
मासळी खाउन,
काटे अंगणात पुरताना,
तो हिशोब आत्ता दे,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...
एकशे सोळा माडीचे बील,
भरून खांद्या वरून तुला नेले ,
वल्ले काजू, भाजके दाणे
हिशोब यांचे नाही केले
खोटारड्या, वायदे तुझे फार झाले
मला आता तारीख दे ,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...
एकदा माझ्या, सापड तावडीत,
तुला गाडून टाकेन,
तेव्हाच मी पण सुटेन,
तेव्हाच मी पण सुटेन,
पैजारबुवा,
वरिजनल गाण्याचे लिंक :- https://www.youtube.com/watch?v=4aPHP0n1no8
टिप :- वरीजनल गाणे ऐकता ऐकता भावानुवाद वाचत मोठ्यांदा म्हणून बघा, म्हणजे तुम्हाला कंसातला (भिकारड्या) हा शब्द पण ऐकू येईल, आरडीने तिकडे उगाचच गिटार वाजवली आणि गाण्याचा मूळ अर्थ बदलून टाकला. मूळ कवितेत त्या गिटार ऐवजी "कुत्ते" असा शब्द होता.