शून्यातून पाय फुटल्यासारखे
आकडा भराभर धावतात...
खुप खुप दमल्यावर
शुन्याच्या मागे सामावतात...
भोपळा भोपळा हिणवले
पहिल्यांदा हाच तर गिरवला...
डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट
जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले...
कधी असंच पुढं आल्यावर
तो 'पूज्य' राहत नाही
कुठल्याशा वळणावर अचानक
शून्याशी गाठ सुटत नाही...
त्याला पाठीवर घेऊन चालतांना
छातीवरल्या आकड्यांंच ओझ
कधी जाणवत नाही की
अनायसे कुबड भासत नाही...
-भक्ती