पेर्णा
मित्रों......
तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही.
व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही.
ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले
प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले.
लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती
लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती
लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर,
लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर.
पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का?
इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का?
तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही
वाटलं होतं इथेच बनेल..लस बनली...पुरली नाही
....
आज पुन्हा लॉकडाउनात कोरोना बेबंद फिरत आहे,
आज पुन्हा मोबाइलात मी माझाच स्लॉट शोधत आहे.....