पेरणा
http://misalpav.com/node/48397#new
खेडूत सरांच्या ह्या पेमळ सुचणे प्रमाने त्यातल्या त्यात विडंबण पाडले
(आतल्या आत)
संयमचौकटी मोडून पडल्या तेव्हा
मी अधांरातच घेतला डबा हातात
मग रिक्तजहालो मनमुराद
अन् ओसंडून सांडलो आपल्या परसात
पोटभर कळ उसळली तेव्हा
मी प्रपातावर कसून केली मात
मग ब्याटरीतळीच्या अंधारी बुडालो
अन् घमघमलो सुखावलो आतल्या आत
भ्रमनिरास बनले जगणे सगळे जेव्हा
लॉकडाऊनी वडापावही जाहला दुरापास्त
आता सभोवती उसळे कोलाहल तरीही
कुंभकरण थाळी मी सहजच करतो फस्त
पैजारबुवा,