पेरणा http://misalpav.com/node/47605
अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली
म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...
...मारीला म्यां डोळा 😉
पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा.
घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा
शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी कडवी.
संपतील एकदाची आत्ताच?
की,
ध्रुपदत राहतील
पुन्हा नव्या पाखराच्या मागे
आज
उद्या
परवा
तेरवा
पुढच्या आठवड्यात
पुढच्या महिन्यात
पुढच्या वर्षी
पुढच्या दशकात
पुढच्या जन्मात???????
(अनुभवातून शहाणा न होता पुन्हा पुन्हा प्रेमात पडणारा सच्चा आशिक) पैजारबुवा,