राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी
प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे
राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी
आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी
रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी
आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे
दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना
मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना
नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे
भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी
आता उभारती खोटे चित्र मित्रांचे जनीमनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरच्या हळदीवर ते ओतून कोमट पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे