केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?
घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल
तरीही प्रश्न शिल्लक रहातो
सगळे नोकर चाकर व्यवस्था असून
कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ?
प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी
प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा
प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा
प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा
कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो
अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ?
केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?
.
.
.
.
.
.
* अनुषंगिका व्यतरीक्तची आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार