फुलपाखरू
एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरू ..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.
फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..
त्याच कटु
आठवणींने बळ
तयाच्या पंखास दिले
संकटावर मात करुन
त्यास नव्या उमेदीने
जगण्यास शिकवले!..
-दिप्ती भगत
(१३जून, २०१९)