बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !
मात्र अता "सद्गुरू" म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास
झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
अहोरात्र मी झुरे
काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)
अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!