धर्म इथे बेताल झाला
उठतासुटता जहाल झाला
वापरले कैक रंग त्याने
कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ...
किती चढले सुळावर त्याच्यानावे ,
मारणारे गनीम आणि मरणारेही ..........
पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे
पण .........जो तो हलाल झाला
जन्नत नसीब झाली कुणा
तर कुणी स्वर्गात पोहोचले
अरे पण त्यांचे काय झाले असेल ?
ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले
अपराध कुणाचा , कुणी भोगला
कामकऱ्याला जागेवरी ठोकला
मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी
हिरवा भगवा पुढे नाचला
हिजडे हरामी धर्मवेडे
रंगबिरंगी धर्मांमध्ये
फुका पाजती विषाचा प्याला
माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला