पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! )
"कशाला मरतेस? मलाच मार!
प्रेम तुझ गेलं कुठं!?" :(
"जरा पोरांकडे लक्ष दिलं,
तर वाटायला लागलं का? सगळ सुटं सुटं!? "
"तीच कुठे आहेत फक्त?
मीही नाही का तुझा!?"
"आहाहाहा !!! लै लाडात आलास रे आज?
मी माझा...मी माझा!"
"अगे दुष्ट दुष्ट बाई
कीती दगड हाणतेस?
नाशिक.. नागपूर.. कोल्हापूर.. सोलापूर!!!?
काय काय मधे आणतेस?"
"तु जरासा बाजूला हो
मंजे यातलं का...ही तुला लागणार नाही.
आणि काय रे आधीची मी बायको
आत्ताच कशी झाले रे बाई!?"
"नाही नाही..नाही,
तस्स का...ही नाही!
शब्द वापरताना चुकून,
ज..राशी झाली घाई!"
"सोंग बाकी छान घेता,
तुम्ही नवरे लोक."
"आज सोडणार(च) नाहियेस का?
धर की ठोक!धर की ठोक!"
"ज्जा! कार्टी शाळेला जायच्येट
डबा उचल आणि तु ही पळ!"
"ठीक.संध्याकाळी उरलेलं भांडू
आता..खा..झोप आणि कमव बळ!"
"माझ्यातली बायको गेली..,
तर तुझ्यात बाप आण की!?"
"तेच म्हटलं..जाता जाता
एक तरी हाण की!!!"
"किती रे कातडी निबर!?????
नवरेपणाचा हा कळस आहे!!!!!!"
"नाय गग्गग्गग्ग...मी नव्हे तो कडक पिंपळ,
मी साधा मऊ पळस आहे!!!"
"कित्ती दुष्ट आहेस रे मेल्या...,
हसता हसता रडवलस!"
"पण आज मात्र ह्या नवर्यातल्या
बापाला तू पढवलंस!"
"ज्ज्जा आता लवकर..
आणि लवकर परतंही ये!"
"येतो ग सखे लवकर
तोपर्यंत थोडी गाई गाई घे!"
चला आता मी ही
तुमचा,
इथेच पूर्ण विराम घेतो.
नवर्यामधला बाप,
सापडतो का? पाहून येतो!
====०====०====०====०====
अतृप्त...