आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट).. पण सेमिस्टर बाय सेमिस्टर अश्या ह्या single and ready to mingle मुलांची संख्या वाढतच चाललीये.. त्यावरच प्रकाश टाकणारी हि कैच्याकै क्विता..
परत तस्संच झालं भाऊ
काही समजत नही
डोक्याचा झाला भुगा
फ्रेंडझोनमात्र भेदत नही
जॉईंटकाडी बुलेटगाडी
ऐश कमी नाही
M३ सुटला तरी ह्याला
गफ मिळत नाही
सर्वांना हवी छोकरी
स्कर्ट, टॉप आणि बाईकवर मिठी
यांच्या अपेक्षा तरी किती,
इकडे मात्र कधीकधी आंघोळीचीही खोटी..
याच्या बॅचमधल्या क्रशला टिंडर मॅचने नेले
गॅदरिंगचे सेटिंग पण M.S. करता गेले
हातात राहिले लाईकवणे फक्त तिचे फोटो
फ्रेंडलिस्टा धुंडाळणे झोपतानाचा चाळा होतो
आता तर कॉलेजेसही सुटली मोकाट
इंजिनीअरिंग बरोबरच असतो डिप्लोमाचा थाट
बालिशपणा त्यांचा दिवसेंदिवस पकवणार
केट्यांनी पिचलेला इंजिनीअर, अजून किती फिरणार?
मेक्यानिकलला ऍडमिशन घेऊन बघ भाऊ
किती ड्रॉप्पर आशिक तुला दावू
भ्रांत त्यांची कोणी समजावी
दहापैकी नऊ जवळ करतात (जुना) संन्याशी