स्वामी चरणी समर्पित
...
डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....
तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये
आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये
जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये.....
धागा काढण्याची तल्लफ मात्र.....??
तल्लफ काही माझ्या आधीन नाही......
वाचकांचीही पत्रेवाला नाखु