एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???
पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.
चौकीदाराला मिठी मारून झाले ... चोर म्हणून झाले
मंचावर सर्वांसोबत हात गुंफून उंचावणे झाले
गंध- टिळा लावून पूजेला बसणे झाले
जानवे धोतर लेऊन मंदिरात जाणे झाले
बहात्तर हजाराची पुंगी वाजवत बाह्या सरसावणे झाले
... पण चौकिदार अडिग, अजिंक्य आहे.
तिकडे माया ममता केज्रू शर्दू चंद्रू आणि कोणकोण ...
सिंहासनावर डोळे गाडून बसलेत
आणि तो शुभ्रमणि-यम-स्वामी वक्र दृष्टीने बघतो आहे.
त्याने तर पूर्वी मम्मीला पण सिंहासनावर बसू दिले नव्हते...
मग तिने उभारलेले बुजगावणे ...
मोडीत काढल्यानंतर तरी सिंहासन मिळायला हवे होते
.... हीच तर घराण्याची रीत होती, सिंहासनावर भारीच प्रीत होती
पण तो चौकीदार मधेच कडमडला ... सगळेच मुसळ केरात गेले.
अरे कुठे आहे तो सपिल किब्बल ? कुठे आहे डिग्गीराजा, कुठे गेला मोतिरादैत्य ?
झोपा काढायला ठेवलेय का त्यांना ?
सांगितलेच पाहिजे मम्मीला, आता त्यांचे नाव
विचारानेच कसेतरी होत रहाते ...
डोके हरवलेला पप्पू
दाराआडून बघत रहातो...
बघतच रहातो ...