एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....
-चमचमचांदन्या