केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून
करायला गेलो आत्महत्या
टाकला दोर उभा वर पंख्यांला
राहत्या नव्या घरी
गच्चं मारुनी गाठ
दाखवणार होतो आयुष्याला पाठ
घेतला गळफास तेव्हा
गदागदा हलु लागले सिलिंग
फुसका बार निघतोय कि काय ?
याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग
साला , नको तो डोक्याला ताप झाला
सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला
दोघेही उताणे एकावर एक पडलो
दोघेही जागच्या जागीच मोडलो
घातली बिल्डरच्या नावाने शिवी
साला बिल्डर हाय कि न्हावी ?
साल्याने एवढी मोठी इमारत बांधली
पण आत्महत्या करता येऊ नये
याची पुरेपूर काळजी घेतली
आत्महत्या बाजूलाच ह्रायली
पोलिसांची सूत्रं भराभर हलली
उचलून टाकले बिल्डरला तुरुंगात
माझे उर्वरित दिवस मात्र गेले फुकटचे सत्कारात
कुठली आत्महत्या नि कसलं काय ?
आजकाल कशाचाच भरवसा राहिला नाय
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}